ADMISSIONS OPEN

My experience with The DES. School is since last few years and it has been very satisfying as the School is very progressive and growing. I am very happy to see my Daughter evolve, grow and blossom into the person she truly is. The way of nurturing the children through performances and different activities has overwhelmed us.

Shri. Avinash Lashkare
Shri. Avinash Lashkare

नमस्कार मी स्वाती मयूर नरवडे, माझी मुलगी कुमारी कादंबरी मयूर नरवडे या शाळेमध्ये शिकते. शाळेचे इमारत अतिशय प्रशस्त आणि सुसज्ज आहे. शाळेतील सर्व शिक्षक मुलांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहेत. शाळेमध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक आणि सांस्कृतिक विकासाकडेही लक्ष दिले जाते. नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि मुलांना त्यामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते. भारतीय सण व उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरी केले जातात. शाळेतील आवारात मुलांना अतिशय सुरक्षित असे वातावरण उपलब्ध करून दिलेले  आहे. मुलांच्या व पालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना ही केल्या जातात. शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आम्हा पालकां तर्फे शुभेच्छा. 

सौ. स्वाती मयूर नरवडे
सौ. स्वाती मयूर नरवडे

डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या शाळेत माझी दोन मुले शिकत आहेत. या शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, खेळ , कृतियुक्त उपक्रम , आंतरशालेय स्पर्धा  पुण्यतिथी, जयंती असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. प्रामाणिकपणा, शिस्त हे सर्व गुण विकसित होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. वेळोवेळी पालकांसोबत सभा घेतल्या जातात. या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतात. सर्व मुलांना बरोबरीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलाच्या कलागुणांना वाव दिला जातो. अभ्यासाबरोबरच संस्कारही आमच्या मुलांना या शाळेत मिळतात. गणपती स्तोत्र ,अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र ई. असे विविध प्रकारे मुलांवरती संस्कारही केले जातात. 

सौ. स्वाती योगेश कर्डिले
सौ. स्वाती योगेश कर्डिले